मोबाईलवर जमीन आणि शेतीची मोजणी करा, अगदी सोप्या पद्धतीने mobile varun shetichi mojani kara agadi sopya padhatine

मोबाईलवर जमीन आणि शेतीची मोजणी करा, अगदी सोप्या पद्धतीने शेतकरी मित्र आणि जमीनधारकांनो, आता तुम्हाला तुमच्या जमिनीची किंवा शेतीची मोजणी करण्यासाठी कुणाचीही मदत घेण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरच अगदी अचूक आणि सोप्या पद्धतीने हे काम करू शकता. या लेखात आपण ‘जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर’ (GPS Area Calculator) ॲपचा वापर करून दोन मिनिटांत जमीन कशी मोजायची, हे सविस्तर पाहणार आहोत.

जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर ॲप डाउनलोड करा : mobile varun shetichi mojani kara agadi sopya padhatine

सगळ्यात आधी तुम्हाला गुगल प्ले स्टोरवर जाऊन ‘जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर’ (GPS Area Calculator) हे ॲप शोधायचे आहे. अनेक ॲप्स उपलब्ध असले, तरी ‘जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर’ हे ॲप ‘AJK Infosoft’ या कंपनीचे आहे. या ॲपला चांगले रेटिंग मिळाले आहे, त्यामुळे हेच ॲप डाउनलोड करा.

ॲपमध्ये प्रवेश (लॉगिन) करा :

१. ॲप डाउनलोड झाल्यावर ते ओपन करा. ॲप सुरू झाल्यावर तुम्हाला तुमच्या लोकेशनची परवानगी (Location Permission) मागितली जाईल, ती ‘Allow’ करा.

हे पण वाचा:
tractar gst update शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! या तारखेपासून ट्रॅक्टर होणार स्वस्त..! tractar gst update

२. त्यानंतर ‘Let’s Started’ या बटणावर क्लिक करा.

३. आता ॲपला मीडिया आणि फाइल्सची परवानगी द्या. हे झाल्यावर ॲप आपोआप तुम्हाला तुमच्या सध्याच्या लोकेशनवर घेऊन जाईल.

जमिनीची मोजणी कशी करावी? :

ॲपमध्ये जमिनीची मोजणी करण्यासाठी दोन सोपे मार्ग आहेत:

हे पण वाचा:
koradvahu kshetra vikas yojana asa kara arj ! कोरडवाहू क्षेत्र विकास योजना असा करा अर्ज ! koradvahu kshetra vikas yojana asa kara arj !1

१. जमिनीवर चालत मोजणी (Measuring by Walking):

जर तुम्ही तुमच्या शेतात किंवा जमिनीवर उभे असाल, तर तुम्ही ‘Measuring by Walking’ हा पर्याय निवडू शकता.

  • हा पर्याय निवडल्यावर तुम्ही तुमच्या जमिनीच्या हद्दीवरून चालत गेल्यास ॲप त्या हद्दीची आपोआप नोंद करेल आणि पूर्ण हद्द फिरून झाल्यावर तुम्हाला एकूण क्षेत्रफळ मिळेल.

२. नकाशावर मॅन्युअली मोजणी (Measuring by Manually):

हे पण वाचा:
kadadi lagavaditun kara lakhonchi kamai ! काकडी लागवडीतून करा लाखोंची कमाई ! kakadi lagvaditun kara lakhonchi kamai!

जर तुम्ही जमिनीवर नसला, तरी तुम्ही ‘Measuring by Manually’ हा पर्याय वापरून नकाशावर मोजणी करू शकता.

  • हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला ‘Add point’ किंवा ‘Add’ नावाचे एक बटन दिसेल.
  • आता तुम्हाला नकाशावर तुमच्या जमिनीच्या हद्दीच्या कोपऱ्यांवर (Points) टॅप करायचे आहे.
  • प्रत्येक कोपऱ्यावर टॅप करत तुम्ही संपूर्ण हद्द निश्चित करू शकता.
  • जर चुकून चुकीच्या ठिकाणी टॅप झाले, तर तुम्ही ती चूक दुरुस्त (Undo) करू शकता.

क्षेत्रफळ कसे पाहावे? :

एकदा का तुम्ही जमिनीची हद्द पूर्ण करून घेतली, की तुम्हाला वरच्या बाजूला ‘एरिया’ (Area) नावाचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या जमिनीचे क्षेत्रफळ एकर (Acre), स्क्वेअर फूट (Square Feet) किंवा हेक्टर (Hectare) यांसारख्या विविध युनिटमध्ये पाहता येईल.

अशा प्रकारे, या ॲपचा वापर करून तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी मोबाईलवरच अचूकपणे करू शकता. हे ॲप शेतकरी आणि जमीनमालकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे, कारण यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाचतात. mobile varun shetichi mojani kara agadi sopya padhatine

हे पण वाचा:
imd weather update महाराष्ट्रामध्ये पुढील २४ तास धोक्याचे, या जिल्ह्यांना ‘हाय अलर्ट’ imd weather update

तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

हे पण वाचा:
keshari ration card केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी थेट रोख रक्कम ! keshari ration card

Leave a Comment